श्रीगोंद्यात पिता आणि मुलीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना,जन्मदात्याकडूनच मुलीचा विनयभंग.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पिता आणि मुलीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात घडली असून, मागील तीन वष्र्यांपासून हा जन्मदाता बाप आपल्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करत होता. परंतु वडिलांच्या भीतीपोटी ही मुलगी गप्प राहिली होती. या घटनेबाबत पीडित मुलीने वेळोवेळी तिची आई व नातेवाईकांना याबाबत माहिती दिली होती. 

परंतु कुणीही तिची मदत केली नाही, उलट आज याच अल्पवयीन मुलीचा आधी एक लग्न झालेल्यापुरुषासोबत लग्न लावण्याचा डाव या मुलीच्या घरच्यांनी आखला होता. परंतु श्रीगोंदा पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे हा प्रयत्न हाणून पाडला. 


या सर्व प्रकाराबात या अल्पवयीन पीडित मुलीने स्वत:च्या जन्मदात्या पित्याच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिसांनी या पीडित मुलीच्या बापाविरोधात विनयभंग तथा बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण या कलमांन्वये गुन्हा दाखल करत, आरोपीस ताब्यात घेतले आहे..

याबाबत माहिती अशी की, तालुक्यात अल्पवयीन मुलगी ही तिचे आई वडील व भावासोबत राहाते. तिचे वडील शेती व सेंट्रीगचा व्यवसाय करतात.संबंधित कुटुंब वस्तीवर राहात असल्याने या मुलीची शाळा बंद केली आहे.

सन २०१५ मध्ये घरी कुणीच नसताना तिच्याशी या नराधम बापाने अश्लील चाळे केले मात्र घाबरल्यामुळे तिने याबाबत घरात कुणालाच काही सांगितले नाही. त्यानंतर वेळोवेळी तिच्या वडिलांनी या मुलीशी अश्लील वर्तन करत तिच्याकडे संबंध ठेवण्याची मागणी करत तसा प्रयत्न देखील केला. परंतु मुलीने प्रतिकार केल्याने ती या नराधम बापाच्या तावडीतून बचावली. 

Loading...
सदर प्रकार मुलीने आपल्या आईला सांगितला. आईने याबाबत वडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण तो ऐकत नसल्यामुळे काही नातेवाईकांनाही याबाबत सांगितले, परंतु त्यावर कोणताच परिणाम झाला नाही. 

या सर्व प्रकाराने त्रासलेल्या मुलीला न्याय मिळवून देण्याऐवजी मुलीच्या आईने व नातेवाईकांनी या मुलीचेच आठ दिवसांपूर्वी कर्जत तालुक्यातील एका गावातील आधीच एक लग्न झालेल्या माणसासोबत लग्न जमवले होते. 

त्यामुळे या मुलीने एका सामाजिक संघटनेच्या मदतीने या अल्पवयीन विवाहाबाबत श्रीगोंदा पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार श्रीगोंदा पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी सोमवार दि.६ रोजी पहाटे एक पोलीस पथक त्या पीडित मुलीच्या गावात पाठवले. परंतु सदर पीडित मुलगी त्याठिकाणी पोलिसांना सापडली नाही. 

त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता सदर मुलगी ही तालुक्यातीलच एका गावातील नातेवाईकांकडे असल्याची माहिती पोवार यांना समजली. त्यानुसार त्या गावात कर्मचारी पाठवत या पीडित मुलीला ताब्यात घेतले. त्यामुळे या अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला गेला.सदर मुलीला श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आणल्यानंतर आपल्या वडिलांविरोधात फिर्यांद दिली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Loading...
Powered by Blogger.