फ्रेंडशिप डेच्या पार्टीमध्ये मित्राचा दगडाने ठेचून खून.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये एक धक्कादायक खून प्रकरण समोर आलं आहे. दौंडच्या वाघोले वस्तीवर फ्रेंडशिप डेच्या रात्री पिंटू शेलार नावाच्या तरुणाचा शास्त्राने आणि दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. घरात मित्रांसाठी टेवलेल्या पार्टीमध्ये शुल्लक कारणावरून वाद झाला आणि पिंटूच्याच मित्रांनी त्याचा जीव घेतला आहे. 
Loading...

पिंटू शेलार याने घरी आखाड पार्टीच आयोजन केलं होतं त्यासाठी त्याने काही मित्रांना घरी बोलावलं होतं मात्र जेवण्यापूर्वी त्यांच्यामध्ये वाळूच्या लिलाववरून वादावादी झाली आणि त्याच पर्यवसन शेलार याच्या खुनात झालं. रागाच्या भरात त्याच्या मित्रांनी शेलारचे हातपाय तोडून दगडाने ठेचून त्याची हत्या केली आणि तिथून पळ काढला.


या प्रकरणाची खबर लागताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळावरून पोलिसांनी एक गावठी कट्टा जप्त केला आहे. फ्रेंडशिप डेच्या दिवशीच मैत्रिचा असा घात झाल्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.आपल्या मित्राचा जीव घेऊन पळ काढलेल्या शेलारच्या मित्रांना पोलिसांना ताब्यात घेतलं आहे. 

दरम्यान, पिंटू शेलार आणि त्याच्या मित्रांच्या नावे आधीच अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मित्रांनी आपल्या मित्राचा जीव घेतला आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास घेत आहे.या सगळ्या प्रकारामुळे मैत्रीच्या नात्याला काळीमा फासला गेला असंच म्हणावं लागेल.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.