सरकारी कर्मचार्‍यांचा उद्यापासून तीन दिवसांचा संप.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सातवा वेतन आयोग व इतर प्रलंबित मागण्यांबाबत राज्य सरकारी कर्मचार्‍यांनी उद्यापासून (मंगळवार) तीन दिवसांचा संप पुकारला आहे. तीन दिवसीय संपास राज्यातील शिक्षक, हिवताप कर्मचारी यांच्यासह विविध विभागाच्या शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांनी संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शासकीय कामांचा बोजवारा उडण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. 


Loading...
राज्यभरात अगोदरच मराठा आरक्षण आंदोलनामुळे वातावरण बिघडलेले आहे. त्यातच येत्या 9 ऑगस्ट रोजी जेलभरो आंदोलनाचा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. अशा परिस्थितीत सरकारी कर्मचार्‍यांनी संप पुकारल्याने राज्यव्यवस्था आणखीच बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

त्यामुळे हा संप टळावा यासाठी सरकारी पातळीवरून जोरदार हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनी शनिवारी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून संप मागे घेण्याचे आवाहन केले होते. परंतु तोडगा निघाला नसून शासकीय कर्मचारी संपावर ठाम आहेत. 


शासनाने गेल्या दोन वर्षांपासून कर्मचार्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत शासनाने आश्‍वासनांची पुर्तता केली नाही. यामध्ये शिक्षक संघटनेने आंदोलनात उडी घेतल्याने शिक्षकांच्या संपामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी या तीन दिवसीय संपाला सक्रीय पाठिंबा व्यक्त करुन, या संपात सहभागी होण्याचे जाहिर केले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.