शहरातील प्रलंबित उड्डाणपुलास हिरवा कंदील !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शहरातील प्रलंबित उड्डाणपुलाच्या मुद्यावर द्विवेदी यांनी महासभेत आग्रही मत मांडले. शासनाच्या परिपत्रकानुसार उड्डाणपुलास भूसंपादनास मंजुरी मिळाली असल्याचे महापौर सुरेखा कदम यांनी जाहीर केले. यामुळे आता उड्डाणपूल होण्यास हिरवा कंदील मिळाला आहे.


Loading...
महानगरपालिकेच्या सभागृहात सोमवारी दुपारी एक वाजता महापौर सुरेखा कदम यांच्या अध्यक्षतेखाली महासभेस सुरूवात झाली. उड्डाणपुलाच्या निधीवरून चर्चेला सुरूवात झाली. यावेळी अनिल शिंदे यांनी सवाल उपस्थित करताना सांगितले, किरकोळ कामाला निधी नाही म्हणता आणि उड्डाणपुलाला 7 कोटी देण्याचा प्रस्ताव दिला जातो. 

उड्डाणपुलाबरोबरच शहरातील कामांनाही निधी द्यावा, उड्डाणपुलाचे श्रेय कोणी घेऊ नये. नवीन आयुक्त रूजू होण्याच्याअगोदर व निवडणुकी अगोदर उर्वरित बजेट रिलीज करावे, असे ते म्हणाले. यावर प्रभारी आयुक्त द्विवेदी म्हणाले, उड्डाणपूल शहरासाठी आवश्यक आहे. पूल उभारण्याची जबाबदारी मनपाची आहे, परंतु आर्थिक अडचणीमुळे केंद्रसरकार करू देत आहे.


नगरसेवकांना स्वेच्छा निधी नोव्हेंबरनंतर रिलीज करण्याचे आदेश अगोदरच्या आयुक्तांनी दिले होते. स्वेच्छा निधी येत्या महिनाभरात रिलीज करण्यात येईल, तसेच नवीन आयुक्तांना बजेट सादर करण्याचे काम ठेवू, असा टोमणा द्विवेदी यांनी शिंदे यांना लगावला. नेप्ती चौक ते सक्कर चौक रस्त्याला 28 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. याबाबत किशोर डागवाले यांच्याकडून खासदार दिलीप गांधी यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. त्याला नज्जू शेख यांनी अनुमोदन दिले. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.