सुपरहिट ''बबन'' च्या अफाट यशानंतर भाऊराव कऱ्हाडे यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- 'बबन'च्या अफाट यशानंतर भाऊराव कऱ्हाडे यांचे दिग्दर्शन असलेल्या  चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे त्याचे नाव ''हैद्राबाद कस्टडी'' असे असून, सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझर पोस्टरद्वारे त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. 


Loading...
या सिनेमाच्या नावावरून आणि टीझर पोस्टरवरून हा सिनेमा पोलीस कोठडी आणि कैद्यांवर आधारित असल्याचा अंदाज येतो. शिवाय, या सिनेमाच्या टीझर पोस्टरवर, थर्ड डिगरीसाठी वापरण्यात येणारा पट्टादेखील पाहणाऱ्याचे लक्ष वेधून घेत आहे. 

इतकेच नव्हे तर, हैद्राबाद कस्टडी असे या सिनेमाचे नाव असल्या कारणामुळे, हा चित्रपट नेमका कशावर आधारित आहे? असा प्रश्नदेखील प्रेक्षकांना पडत आहे. ग्रामीण आणि वास्तविक समस्येवर सिनेमाच्या माध्यमातून भाष्य करणारा दिग्दर्शक म्हणून भाऊराव कऱ्हाडे यांना ओळखले जाते. 


''ख्वाडा'', आणि ''बबन'' हे दोन्ही सिनेमे याच धाटणीचे असल्यामुळे त्यांचा आगामी ''हैद्राबाद कस्टडी'' हा सिनेमा, सिनेरसिकांसाठी कुतूहलाचा विषय ठरत आहे. या सिनेमाची विठ्ठलराव नानासाहेब कऱ्हाडे, प्रमोद भास्कर चौधरी, मोनाली संदीप फंड, भाऊसाहेब शिंदे, रजनीकांत सदाशिव निमसे आणि सुशीला कानडे यांनी या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. तूर्तास, या सिनेमाविषयी आणखीन कोणतीच माहिती समोर आली नसली तरी, लवकरच या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याचे सांगितले जात आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.