जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत मुलींचा संघ अजिंक्य


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी प्रत्येकाला आता सर्व क्षेत्रात यश मिळविण्याच्यासाठी अभ्यास तर महत्वाचा आहे पण मैदानी खेळही तितकाच महत्वाचा आहे. अभ्यासामुळे बौदिध्क क्षमता वाढते तर मैदानी खेळामुळे शारिरीक वाढ चांगली होते. आपल्या शाळेच्या मुलींनी अभ्यासाबरोबरच फुटबॉल स्पर्धेत अजिंक्यपद मिळविले हि कामगिरी सर्वांसाठीच अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन महर्षी प्रतिष्ठान संचलित श्री साई इंग्लिश मिडीयम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष अशोक कानडे यांनी केले.

Loading...
अहमदनगर जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धा वाडीयापार्क येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत सुब्रोतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेत श्री साई इंग्लिश मिडियम स्कुलमधील 17 वर्षे मुलींच्या संघाने अंजिक्यपद मिळविले. या विजयी संघाचा गुणगौरव श्री. कानडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

श्री कानडे पुढे म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये सुप्तगुण लपलेले असतात त्यांना बाहेर येण्यासाठी मुलांच्या आवडी -निवडी प्रमाणे वाव आपण दिला कि त्यांची प्रगती दिसून येते. अभ्यासाबरोबरच कला, क्रिडा स्पर्धेत ही विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी आमची शाळा प्रयत्नशिल असते. त्यामुळेच मुलींच्या अंतिम सामन्यात ऑक्झीनियम स्कूलचा 1-0 ने पराभव करुन संघ विजयी ठरला. तर 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने अंतिम सामन्यात उपविजय मिळविला हि कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी क्रिडा शिक्षक प्रसाद पाटोळे यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात स्वत:ला झोकून देत जा यश मिळणारच. आपल्या शाळे मधील मुलींच्या यशामुळे या संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

या स्पर्धेत संघाला यश मिळवून देण्यार्‍या मुलींच्या संघाचे कर्णधार राधीका राहिंज तर उपविजयी ठरलेल्या मुलांचा संघाचा कर्णधार आकाश यादव सह स्पर्धेत चांगली कामगिरी करणार्‍या खेळाडूंचा सत्कार विद्यालयाचे शैक्षणिक संचालक नंदकिशोर भावसार यांचे हस्ते करण्यात आला.या सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन प्राचार्य अर्चना झोपे, सुनिल केदार,सर्व शिक्षकवृंद आदिनी करुन पुढील विभागीय सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.