स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून ६ लाख ३३ हजाराला लुटले


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कोपरगाव तालुक्यातील पश्चिम भागातील गोदावरी नदीलगत असलेल्या धारणगाव शिवारातील पाण्याच्या टाकीजवळ राजाराम दादा शेळके (रा. शेळके वस्ती, ता. चांदवड, जि. नाशिक) यांना बोलावून घेऊन स्वस्तातील सोने देण्याचे आमिष दाखवून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. 


Loading...
आठ ते दहा व्यक्तींनी त्यांना लाठ्या, काठ्यांनी मारून त्यांच्याकडील ६ लाख २ हजार ५०० रूपये रोख तसेच दोन तोळ्यांची गळ्यातील चेन आणि ३ हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला. असा एकूण ६ लाख ३३ हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे.

आरोपी अर्जुन रामचंद्र पिंपळे (भरवीर, ता. चांदवड) तसेच ८ ते १० व्यक्ती (नावे माहीत नाही) यांनी राजाराम दादा शेळके यांना स्वस्तातील सोने देण्याचे आमिष दाखविले. कोपरगाव तालुक्यातील धारणगाव येथे सोने देण्याचे नियोजित वेळेत ठरले असता शेळके पैसे घेऊन ठरलेल्या ठिकाणी आले. 


आरोपी अर्जुन रामचंद्र पिंपळे समवेत ८ ते १० व्यक्तींनी शेळके यांना लाठ्या, काठ्यांनी मारहाण करून त्यांच्याकडील पैसे घेतले. या घटनेची खबर तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली असून गुन्हा रजिस्टर नंबर ९८/२०१८ नुसार भा.दं.वि. कलम ४२०, ३९५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.