मराठा आरक्षण मिळवावे लागेल त्यासाठी संघटित व्हा : ॲड. ढाकणे


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मराठा समाजाला आरक्षणाची कधी नव्हती एवढी गरज आज निर्माण झाली आहे. समाज संक्रमण काळातून जात आहे. मुख्यमंत्र्यांना आरक्षण द्यायचेच नाही. मग चार वर्षात का दिले नाही. आरक्षण आता देणार नाहीत, ते मिळवावे लागेल, त्यासाठी संघटित व्हा, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस आणि केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲड. प्रताप ढाकणे यांनी केले. 


Loading...
पाथर्डीत वसंतराव नाईक चौकात सुरू असलेल्या सकल मराठा समाजाच्या आरक्षणासाठीच्या ठिय्या अंदोलनाला ढाकणे यांनी रविवारी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला. या वेळी शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे सदस्य अनिल कराळे, बाजार समितीचे सभापती बन्सी आठरे, नगरसेवक बंडू बोरुडे, अनिल महाराज वाळके, चंद्रकांत भापकर, महेश बोरुडे, पोपट राजळे, अनंत ढोले, सीताराम बोरुडे, स्वप्निल देशमुख, डॉ. योगेश वाकचौरे, हेमंत सुपेकर, यांच्यासह सकल मराठा समाजाच्या वतीने दहा दिवसांपूर्वी सुरू केलेल्या ठिय्या अंदोलनात सहभागी झाले. 

या वेळी बोलताना प्रताप ढाकणे म्हणाले, मराठा समाजाची आजची आर्थिक परस्थिती हलाखीची बनली आहे. यामुळे आरक्षण मिळणे गरजेचे आहे. मराठा समाजाची मंडळी ऊसतोडणी कामगार म्हणून काम करीत आहे. मुलांना शिक्षणासाठी आरक्षणाची अत्यंत गरज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनुवादाचे समर्थन करीत आहेत. 


ते स्वार्थासाठी कधी हिंदुत्ववाद तर कधी जाती -धर्माच्या नावाने राजकीय स्वार्थ साधत आहेत. धनगर मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण देऊ व मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याचे शासनाने कबूल केले, त्याची एकही वीट अद्याप लावलेली नाही. 


आरक्षण देण्याची सरकारची मानसिकता नाही.आरक्षण घ्यावे लागेल. संघटितपणे आरक्षणासाठी लढा उभारावा लागेल. शांततेच्या मार्गाने आंदोलन करू. नऊ ऑगस्ट २०१८ रोजी तालुक्यात चक्काजाम आंदोलन करू. तहसील कार्यालयाला टाळे ठोकू. मोहोज देवढे येथील उद्योजक मुक्ताजी काटे, कैलास देवढे, बाबूजी आबा देवढे, संदीप भवर, मिनीनाथ हाडके, गहिनीनाथ काटे यांनीही मराठा समाजाच्या आंदोलनात सहभाग घेतला. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.