नगर-औरंगाबाद महामार्गावर वाहनचालकास मारहाण


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर-औरंगाबाद महामार्गावर जेऊर गावच्या शिवारात चारचाकी गाडीत आलेल्या चार जणांनी स्विफ्ट कारला गाडी आडवी लावून आमच्या गाडीला कट का मारला असे म्हणत गाडीमधील चालकास मारहाण करून साडेसहा हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Loading...
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संतोष बन्सी क्षीरसागर (वय ४५, रा. हलवाईगल्ली, नगर) हे आपल्या स्विफ्ट कारने नगर-औरंगाबाद महामार्गावरून जात असताना चारचाकी वाहनातून (एम. एच. १७ एझेड ७०६०) चौघा जणांनी स्विफ्ट कारला आपले वाहन आडवे लावून आमच्या गाडीला कट का मारला असे म्हणत क्षीरसागर यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली. 

तसेच त्यांच्या खिशातील ६ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम व आधारकार्ड बळजबरीने काढून चोरून नेले. तसेच क्षीरसागर यांच्या पत्नीसही शिवीगाळ केली. या प्रकरणी क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात चार जणांविरुध्द जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोसई गोरे हे करीत आहेत.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.