मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मराठा, धनगर व मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी नेवासा शहरात आज दि. ५ ऑगस्ट रविवारपासून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. आरक्षण मिळेपर्यंत हे ठिय्या आंदोलन चालूच ठेवणार असल्याचा इशारा अनिल ताके यांनी दिला आहे.

Loading...
मराठा, धनगर व मुस्लिम समाजाला आरक्षण प्रश्नावर शुक्रवारी समाज बांधवांनी नेवासा तहसील कचेरीवर भव्य मोर्चा काढल्यानंतर आता रविवारपासून नेवासा शहरातील श्रीरामपूर रोडवर असलेल्या श्री खोलेश्वर गणपती चौकात बेमुदत ठिय्या आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला. हे ठिय्या आंदोलन बेमुदत असल्याचे सकल मराठा समाजाचे अनिल ताके यांनी यावेळी सांगितले.

रविवारी सकाळी ११ वाजता सुरू करण्यात आलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनामध्ये अनिल ताके, भाऊसाहेब वाघ, संभाजी माळवदे, दीपक धनगे, बाळासाहेब कोकणे, अशोक कोळेकर, युसूफ बागवान, राजेंद्र उंदरे, अभिजित मापारी, संदीप गाडेकर, देवीदास जगताप, गणेश कोरेकर, विशाल सुरडे, असीफ पठाण, कल्पेश बोरकर हे मुख्य आंदोलक असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, नगरसेवक काकासाहेब गायके, जितेंद्र कुऱ्हे, संदीप बेहळे, अंबादास इरले, फारुक आत्तार, भाजपचे माजी शहराध्यक्ष पोपटराव जिरे, जानकीराम डौले, किशोर ठाणगे, भाजपचे जिल्हा चिटणीस नामदेवराव खंडागळे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाळासाहेब पवार, मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष गणेश झगरे, नारायण लोखंडे, धनंजय डिके, कानिफराजे डिके, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष ॲड. संजीव शिंदे यांनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.