नगर-कल्याण महामार्गावर अपघातात मुलगा ठार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर-कल्याण महामार्गावरील निमगाव वाघा शिवारातील सोनवणे पेट्रोल पंपाजवळ झालेल्या पिकअप व अॅपेरिक्षाच्या अपघातात १५ वर्षांचा मुलगा ठार झाला. ही घटना रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. 

Loading...
सुयश गंगाधर जऱ्हाड असे मृत मुलाचे नाव आहे. अपघातात एका महिलेसह तिघेजण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पिकअप वाहन निंबळककडे जात असताना अॅपेरिक्षाला कट बसल्याने हा अपघात झाला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.