महिलेच्या पर्समधील सव्वा लाखाचे दागिने चोरीला


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पुणे-जामखेड एसटी बसने नगरकडे येणाऱ्या महिलेच्या पर्समधील सव्वा लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोराने चोरून नेल्याची घटना घडली असून या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 


Loading...
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सौ. रेखा संदिप टकले (रा. नवीन टिळकर रोड, ता. नगर) या पुणे ते जामखेड एसटी बसने प्रवास करत असताना प्रवासादरम्यान त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले १ लाख ८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण, चांदीचे पैंजन व २० हजार रुपयांची रोख रक्कम असा ऐवज अज्ञात चोराने लंपास केला. या प्रकरणी सौ. टकले यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.