कोपरगाव तालुक्याचे नेतृत्व करण्यास आशुतोष काळे सक्षम


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोपरगाव आमदार कोण हे महत्त्वाचे नाही. अभ्यासू वृत्तीने तालुक्याच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी हे आपले नैतिक कर्तव्य आहे ही भावना आपल्या हृदयात ठेवून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी झटत असलेला युवक नेता म्हणून आशुतोषची जनसामान्यांमध्ये प्रतिमा तयार झाली असल्याचे महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी सांगितले. 


Loading...
काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित व्यापारी धर्मशाळा येथे त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा झाला. या कार्यक्रमात अध्यक्षस्थावरून काेयटे बोलत होते. ते म्हणाले, आशुतोषला तालुक्याच्या प्रश्नांची उत्तम जाण असून जनतेप्रती तळमळ आहे.माजी खासदार शंकरराव काळे व माजी आमदार अशोक काळे यांनी तालुक्याच्या हक्काच्या पाण्याचा सुरु केलेला लढा आजही पोटतिडकीने आशुतोष सुप्रीम कोर्टात लढत आहे.

याप्रसंगी मोहन चव्हाण, नगराध्यक्ष विजय वहाडणे, अशोक रोहमारे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, राजेंद्र जाधव, कोपरगाव व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुधीर डागा यांनी मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ नागरिक संघ, लायन्स क्लब, इंडियन मेडिकल असोसिएशन, वकील बार असोसिएशन, इंजिनिअर्स असोसिएशन, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन, सकल मराठा समाज, सकल जैन समाज, सकल मुस्लिम समाज, नाभिक व माळी समाज सेवा संघ, परीट समाज सेवा संघ, तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.