मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ग्रामपंचायत सदस्यांनी दिले राजीनामे


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सहा सदस्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आपल्या पदाचे राजीनामे दिले असून फडणवीस सरकारचा निषेध व्यक्त केला आहे.. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आत्तापर्यंत अनेक मोर्चे काढले. 


Loading...
रस्तारोको आंदोलने झाली. समाजातील अनेकांनी आरक्षणासाठी आपल्या जीवनयात्रा संपविल्या, आमदारांनी राजीनामे दिले, आपल्या तालुक्यातील पंचायत समितीच्या सभापतींनी देखील आपल्या सभापतीपदाचा राजीनामा दिला. आता हे लोण ग्रामपंचायतीपर्यंत येवून पोहोचले आहे.

महालक्ष्मी हिवरे ग्रामपंचायतीच्या चंपाबाई नानासाहेब गायके, लताबाई मारुती केदार, भारती संतोष सांगळे, मिनीनाथ दत्तात्रय गायके, विलास गोविंद पालवे, राधाकिसन नामदेव सानप विद्यमान सहा सदस्यांनी आपल्या सदस्यत्वाचे राजीनामे ग्रामविकास अधिकारी खाटिक यांच्याकडे सुपूर्द केले आहेत.


याप्रसंगी खरेदी-विक्री संघाचे संचालक राजेंद्र गायके, मुळाचे संचालक एकनाथ जगताप, सेवा संस्थेचे अध्यक्ष शरद बोरुडे, माजी उपसरपंच राजेंद्र पालवे, उद्धव सानप, मारुती केदार, भाऊसाहेब रणबावरे, वसंत पालवे, सुमित पालवे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.