माझे उदिष्ट हे मतदार संघातील सामान्य माणसाच्या विकासाचेच - डॉ. सुजय विखे


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिर्डी मतदार संघाच्या विकासाला शेजारच्यांची मदत होत असेल तर वाईट वाटुन घेवू नका. त्यांच्या विकासाचा निधी आणि योजना आपल्यापर्यंत येत असतील तर जरुर स्विकारा, गटातटाच्या राजकारणात सामान्य माणसाचे नुकसान व्हावे या विचारांचा मी नाही. 

त्यांचा उद्देश राजकारणासाठी असला तरी माझे उदिष्ट हे मतदार संघातील सामान्य माणसाच्या विकासाचेच आहे असे स्पष्ट प्रतिपादन पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले.


Loading...
शिर्डी विधानसभा मतदारसंघात विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक कुटुंबाला रेशन कार्ड मिळवून देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.यासाठी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम सुरू करण्यात आला असून, तालुक्‍यातील निमगावजाळी येथे शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमातून रेशन कार्डसाठी नागरिकांच्या कागद पत्रांची पूर्तता करण्याबरोबरच रेशन कार्डसाठी महसूल विभागाकडून नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.

उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मतदार संघातील प्रत्येक कुटुंबाला शासन आपल्या दारी या उपक्रमातून रेशन कार्ड मिळवून देण्याच्या आश्वासनाची प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाली आहे. येणाऱ्या काळात रेशन कार्डापासून मतदार संघातील एकही कुटुंब वंचित राहाणार नाही असाच माझा प्रयत्न असेल आशी ग्वाही डॉ.सुजय विखे पाटील यांनी याप्रसंगी दिली.

याप्रसंगी बोलताना डॉ.विखे पाटील म्हणाले की, शिर्डी विधानसभा मतदारसंघाची बांधणी ही विकासातून झाली आहे.विकासाची प्रकीया राबविताना लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्याचे प्राधान्य विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षानुवर्षे देत आलो यामुळेच मतदारसंघातील सामान्य माणूस हा विखे पाटील परिवाराच्याच पाठीशी ठामपणे उभा राहात असल्याचा विश्वास व्यक्‍त करुन डॉ.विखे पाटील म्हणाले की, राजकारणातील गटतट कधी एकत्र होतील हे सांगता येत नाही.

विखे पाटील परिवाराचे काम हे सामाजिक बांधिलकीतुन वर्षानुवर्षे सुरु आहे. लोकांची कामे करतांना आम्हाला नातेवाईकांना पुढे करण्याची वेळ आली नाही. सर्वसामान्य लोकांसाठी आम्ही स्वत:पुढाकार घेवून काम करत राहतो. म्हणुनच लोककल्याणकारी योजनांच्या आणि विकासाच्या कामात शिर्डी विधानसभा मतदार संघ महाराष्ट्रात अग्रेसर आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.