मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ९ ऑगस्टला जनआंदोलन शांततेच्या मार्गाने होणार .


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- ९ ऑगस्ट २०१८ रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने होणारे जनआंदोलन शांततेच्या मार्गाने यशस्वी करण्याचा निर्धार मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने येथे घेण्यात आलेल्या बैठकीत करण्यात आला. जनआंदोलनानिमित्त राज्यातील सर्व समन्वयकांच्या सहमतीने आचारसंहिता तयार करण्यात आली आणि त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. 

Loading...
लातूरच्या मराठा क्रांती भवनात शनिवारी (दि.४) सायंकाळी ७ वाजता बैठक घेण्यात आली. बैठकीस समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनआंदोलनाच्या अनुषंगाने अनेकांनी विचार मांडून सूचना केल्या. बैठक शनिवारी रात्री उशिरापर्यंत चालली. शनिवारच्या बैठकीतील निर्णयावर रविवारी सर्वसहमतीने शिक्कामोर्तब करण्यात आले. जनआंदोलन लोकशाही मार्गाने करण्यात येणार असून सकाळपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत ते सुरू राहील. 

रुग्णालये, औषधी दुकाने, रुग्णवाहिका आदींना या आंदोलनातून वगळ्यात आले आहे. त्यांना कसलाही अपघात वा त्रास होणार नाही याची काळजी आंदोलक घेणार आहेत. आंदोलनादरम्यान रुग्णवाहिका आल्यास तात्काळ रस्ता खुला करून दिला जाणार आहे. त्यामुळे या सेवा सुरू ठेवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. समाजबांधव आपल्या शहर व गावालगतच्या मुख्य रस्त्यांवर कुटुंब, चारचाकी वाहने, बैलगाड्या, गुरे घेऊन आंदोलन संपेपर्यंत बैठक करणार आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.