राहुरीत आठ वर्षांच्या मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :लहान मुलीचे अपहरण करणाऱ्याचा शोध घ्यावा, या मागणीवरून बारागाव नांदूर येथील वातावरण तापले आहे. दरम्यान, गुरूवारी रात्री गावातील हाॅटेलवर अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बारागाव नांदूर येथे बुधवारी मध्यरात्री ८ वर्षांच्या मुलीला उचलून नेण्याचा प्रयत्न झाला. 


Loading...
मुलीने अपहरणकर्त्याच्या हाताला झटका मारून पलायन करत घर गाठल्याने पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी मुलीच्या आई-वडिलांनी गुरूवारी पोलिसात फिर्याद दाखल केली. या घटनेच्या निषेधार्थ बारागाव नांदूर येथे ग्रामसभा घेऊन वाढत्या गुन्हेगारीचा बिमोड करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्याकडे केली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.