नगर महापालिका भाजप एकहाती ताब्यात घेणार - खासदार दिलीप गांधी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जळगाव, सांगली-मिरज महानगरपालिका भारतीय जनता पक्षाने एकहाती ताब्यात घेतली. त्याच पद्धतीने आगामी निवडणुकीत नगर महापालिकाही भाजप एकहाती ताब्यात घेईल, असा विश्वास खासदार तथा भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी शनिवारी व्यक्त केला. 
Loading...

जळगाव, सांगली-मिरज महानगरपालिका भाजपने एकहाती ताब्यात मिळवल्याबद्दल नगर शहर भाजपने स्वागत करत ढोल-ताशांच्या गजरात, फटाके फोडून व लाडू वाटून लक्ष्मी कारंजा चौक व चितळे रोड येथे जल्लोष केला. शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखाली शहर भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालय ते चितळे रोड ते नवी पेठ अशी मिरवणूकही काढली. त्यावेळी ते बोलत होते. 


दिलीप गांधी म्हणाले, जिकडे विकास असतो, तिथेच विजय मिळत असतो. या दोन्ही महापालिकांमधील विजयासाठी मंत्री गिरीश महाजन, मंत्री चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे, खासदार संजय पाटील, खासदार ए. टी. नाना पाटील यांच्या मेहनतीने हा अभूतपूर्व विजय मिळाला. 


तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाध्यक्ष अमित शाह व भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या मार्गदर्शनामुळे हा भाजपचा एकहाती विजय होऊ शकला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.