१५ आॅगस्टला श्रीरामपूर जिल्ह्याची घोषणा न झाल्यास जनआंदोलने !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जिल्ह्याचा विभाजनाचा ३० वर्षापासून रेंगाळत आहे. नवीन जिल्ह्याचे मुख्यालय श्रीरामपूर करावे, अशी अनेकवेळा मागणी करण्यात आली आहे. मात्र, येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी जिल्हा विभाजन करून श्रीरामपूरला नवीन जिल्हा घोषित करण्याची मागणी श्रीरामपूर जिल्हा कृती समिती उपाध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

Loading...
१५ ऑगस्टला श्रीरामपूर नवीन जिल्हा घोषित न केल्यास १६ ऑगस्टपासून जनआंदोलने उभारू, असा इशारा लांडगे यांनी दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की, साडेतीन वर्षापूर्वी संस्थापक अध्यक्ष प्रतापराव भोसले यांच्या संकल्पनेतून श्रीरामपूर जिल्हा कृती समिती स्थापन होऊन जिल्हा विभाजन चळवळ उभी राहिली आहे. 

राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार चळवळ, साखर कारखानदारी, उद्योग धंदे, अध्यात्मिक, धार्मिक, सांस्कृतिक इत्यादी क्षेत्रात राज्यस्तरीय वर्चस्वाला तडा न जाता जिल्हा अबाधित राहूनच विभाजन व्हायला पाहिजे. त्यादृष्टीने पालकमंत्री राम शिंदे यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निकषाच्या आधारावर प्राधान्याने १५ ऑगस्टला श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय होण्यासाठी आग्रह धरून प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी लांडगे यांनी केली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.