भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे संविधान बचाव,भाजप हटाव,देश बचाव मोर्चा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भाजप सरकारने गेल्या चार वर्षात एकही आश्वासन न पाळता, नोटा बंदी व जी.एस.टी. लागू करून सर्वसामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या अडचणीत भर घातली. दलित, अल्पसंख्याक व स्त्रियांवरील अत्याचारात वाढ झाली. पेट्रोल व डिझेलचे दर दररोज वाढत असल्यामुळे देशात महागाई वाढली. असा आरोप भाकपचे राज्य सहसचिव अॅड. सुभाष लांडे यांनी केला. 


Loading...
शेवगाव येथे शुक्रवार ( दि. 3 ) रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे संविधान बचाव , भाजप हटाव , देश बचाव जनजागरण मोहिमेअंतर्गत येथील पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष बापूराव राशिनकर, ज्येष्ठ नेते कॉ. शशिकांत कुलकर्णी, प्राचार्य शिवाजी देवढे, कारभारी वीर, संजय नांगरे, बाजार समितीचे संचालक अशोक नजन, भगवान गायकवाड, के. एस. मगर, महादेव आव्हाड, गहिनीनाथ आव्हाड, सुदाम उगले, आसाराम उगले, विठ्ठल उगले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

अॅड. लांडे म्हणाले, भाजप सरकारच्या 4 वर्षाच्या काळात सर्वसामान्य जनतेच्या समस्या सुटण्या ऐवजी वाढत गेल्या. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकरी, कामगार असा सर्व वर्ग या सरकारवर नाराज आहेत. मराठा, धनगर व मुस्लिमम समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवत झुलवत ठेवले,भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी दिलेल्या निवडणूक जाहिरनाम्यामध्ये प्रत्येक वर्षी 2 कोटी तरुणांना नोकऱ्या देणार, प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करणार, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या अधिक ५० % नफा असा हमीभाव देऊ, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू, परदेशातील काळा पैसा भारतात आणू अशी आश्वासने देऊन ‘अच्छे दिन आएंगे’ असे स्वप्न दाखवले होते. परंतु प्रत्यक्षात यातील राफेल विमान खरेदीत भ्रष्टाचार केला. या वेळी पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांना निवेदन देण्यात आले. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.