मतदारसंघातील विकासकामांसाठी १८ कोटी १० लाख मंज़ूर : आ.राजळे


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  पाथर्डी व शेवगाव विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सन २०१८-१९ या वित्तीय वर्षात पहिल्या टप्प्यात १८ कोटी १० लाख खर्चाच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली. 

Loading...
ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे यांचे शेवगाव - पाथर्डी -विधानसभा मतदारसंघासाठी नेहमीच झुकते माप आहे, लेखाशीर्ष २५-१५ तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजना या माध्यमातून भरघोस निधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चालू आर्थिक वर्षात पाथर्डी तालुक्यातील चेकेवाडी ते आल्हणवाडी रस्ता, अंतर ८ किमी. या रस्त्यासाठी ३ कोटी ९८ लक्ष रुपये, तर मुखेकरवाडी ते कोरडगाव-सोमठाणे बु. या ७ किमी रस्त्यासाठी ४ कोटी ५१ लाख रुपये मंजूर झाले आहेत. 

तसेच शेवगाव तालुक्यातील लोळेगाव ते वडुले बु. ते शहाजापूर या ३.१० किमी. रस्त्यासाठी २ कोटी १० लक्ष, राज्यमार्ग ते शेकटे बु. ते लाडजळगाव या सुमारे १० किमी. रस्त्यासाठी ५ कोटी ४५ लाख रुपये आणि शहरटाकळी ते सुलतानपूर (मठाचीवाडी) या ४ किमी. रस्त्यासाठी २ कोटी ५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मंजूर कामांना प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत कार्यान्वित करण्याचे आदेश शासनाने दिले आहे.

या कामांचे लवकरात लवकर ई-टेंडरिंग करून कार्यारंभ आदेश देण्याचे संबंधित यंत्रणेला सूचित करण्यात आले आहे. मतदारसंघातील सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत, सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाचे शासनाकडून जास्तीत जास्त निधी मतदारसंघात कसा आणता येईल, यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असल्याचे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.