छळास कंटाळून विवाहितेची विहिरीत उडी घेवून आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  बँकेचे कर्ज फेडण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत या मागणीसाठी होणाऱ्या छळास कंटाळून विवाहित युवतीने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरुवार दि.२ ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील जाखुरी शिवारात घडली. रोहिणी अमोल वाकचौरे (वय-२४) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.


याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रोहिणी वाकचौरे ही विवाहित युवती वडगावलांडगा येथे सासरी नांदत असताना बँकेचे कर्ज फेडण्यासाठी माहेरुन पाच लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी पती अमोल अण्णासाहेब वाकचौरे, सासू अंजली अण्णासाहेब वाकचौरे व मामे सासरे नानासाहेब गवराम लांडगे (तिघे रा.वडगावलांडगा) हे तिघे जण तिचा शारीरिक व मानसिक छळ करत होते. Loading...
त्यामुळे ती काही महिन्यापासून माहेरी राहत होती. गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास तिने जाखुरी शिवारात असणाऱ्या विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी दत्तात्रय आबू पानसरे (रा. जाखुरी ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी पती, सासू व मामे सासरे या तिघांविरुद्ध गु.रजि.नं. १२०/२०१८ भादंवि कलम ३०६, ४९८ (अ), ३२३, ५०४,५०६ (३४) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.