शिक्षकाचा अपघाती मृत्यू प्रकरणी ८२ लाख नुकसानभरपाईचे आदेश.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  शेवगाव तालुक्यातील लहू बडे या शिक्षकाचा अपघाती मृत्यूप्रकरणी व्याजासह एकूण ८२ लाख ९ हजार रुपये रक्कम नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.आर. नावंदर यांनी दिले. 


याबाबत सविस्तर माहिती अशी की, लहू बडे हे शिवली, ता. मावळ, जि. पुणे येथील माध्यमिक शाळेवर शिक्षक म्हणून काम करीत होते. दि. १३/७/२०१४ रोजी ते त्यांच्या मोटारसायकलवरुन येत असताना समोरुन येणाऱ्या दुसऱ्या मोटारसायकलने त्यांना धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. Loading...
याबाबत त्यांच्या वारसांनी येथील जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला. त्यामध्ये अर्जदार व सामनेवाले यांच्याकडून आलेला पुराव्यावर सुनावणी होऊन जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.आर. नावंदर यांनी मयत शिक्षक़ांच्या वारसांना ६५, ९७, ३२४ रुपये नुकसान भरपाई देण्याबाबत समोरील मोटारसायकलचे विमा कंपनीस आदेश पारित केले. 

त्या रक्कमेवर ९ टक्के व्याज अशी एकूण ८२ लाख ९ हजार रुपये देण्याचा आदेश केला. सदर मोटारसायकल चालकाला वैध परवाना नसल्यामुळे विमा कंपनीस सदर रक्कम मोटारसायकल मालकाकउून वसुल करण्याची मुभा देण्याबाबत आदेश पारित केले. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.