श्रीगोंद्यात चोरांचा धुमाकूळ,निवृत्त पोलिसाच्या घरी चोरी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मागील काही दिवसांपासून तालुक्यात चोरांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरातील नागरिकही चांगलेच धास्तावले आहेत. शनिवारी रात्री शहरातील हनुमाननगर येथील सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी लक्ष्मण गाडीलकर यांच्या घरी मध्यरात्री चोरांनी घराच्या मागील बाजूने खिडकीचे ग्रील काढून प्रवेश केला. जवळपास दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. 

त्यांच्याजवळच राहणारे सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी भाऊसाहेब साबळे यांचे बंद घर फोडले तसेच काष्टी व ढोकराई फाटा येथेही दोन ठिकाणी चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला.. याबाबत माहिती अशी, शहरातील हनुमाननगर येथील सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी लक्ष्मण गाडीलकर यांना शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पहारा देणाऱ्या गुराख्याने उठवत.तुमच्या घराशेजारील बंद असलेल्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे सांगितले. 
Loading...

त्यावर गाडीलकर यांनी त्यांच्या घराशेजारी राहणारे पण सध्या बाहेरगावी गेलेल्या सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी भाऊसाहेब साबळे यांच्या घराकडे धाव घेतली.साबळे यांच्या घराच्या गेटचे व दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले.याबाबत त्यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात माहिती देऊन, स्वत:च्या घरात पाहणी केली. 

तेव्हा त्यांना त्यांच्या बेडरूमला आतून कडी असल्याचे दिसले, त्यांनी घराच्या मागील बाजूने जाऊन पाहिले असता. चोरांनी खिडकीचे ग्रील काढून आत प्रवेश करत बेडरूममधील जवळपास १ लाख, ४८ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचे आढळले. याबाबत कविता लक्ष्मण गाडीलकर यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शनिवारी सकाळी श्वानपथक, ठसेतज्ज्ञ आदींनी घटनास्थळी भेट दिली. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.