लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरून मला शिवसेनेमधून काढले - नीलेश लंके.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर आणि पारनेर दोन्ही तालुके दुष्काळी समजले जातात. उच्च शिक्षित तरुणांचे प्रमाण नगर तालुक्यात मोठे आहे. पण तरुणांच्या हाताला रोजगार नाही. रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी नगर-पारनेरच्या लोकप्रतिनिधीनी प्रयत्न केले नाहीत. नगरच्या कितीतरी नंतर सुपा एमआयडीसी झाली. तेथे आठ हजार पेक्षा जास्त तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. नगर तालुक्यातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याचे मत नीलेश लंके यांनी व्यक्त केले.

नगर तालुक्यातील देहरे येथे नीलेश लंके प्रतिष्ठाणची स्थापन केली. या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी डॉ.अनिल डोंगरे, शाहरुख शेख, विठ्ठल पठारे, साहेबराव काळे, भानुदास भगत, हरिदास जाधव, योगेश कटारिया, गणेश साठे, बाळासाहेब पानसरे, एकनाथ झावरे, सनी लांडगे, महेश काळे, ठकाराम लंके, दत्त खताळ आदी उपस्थित होते. 

Loading...
यावेळी लंके म्हणाले गेल्या कित्येक वर्षा पासून देहरे येथेही भुयारी मार्गचा प्रश्न रखडला आहे. भुयारी मार्ग तयार होऊनही जनतेच्या वापरासाठी रस्ता चालू नाही. हा रस्ता चालू करण्यासाठी प्रयत्न करणार. तसेच सरकारी जमिनीत ज्या गोरगरीब जनतेने पक्के घरे बांधली आहेत. यांना त्या जागेचा उतारा मिळवून देण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करणार आहोत. 

नगर तालुक्यातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी हव्या आहेत. नगर नंतर औरंगाबाद, रांजणगाव, सुपा, औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या आणि वाढल्या पण नगरची औद्योगिक वसाहतीची वाताहात होत चालली आहे. या भागातील लोकप्रतिनिधीनी तरुणांच्या बेरोजगारी च्या प्रश्नाकडे कधीही लक्ष दिले नाही. 

मी सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये तरुणांना रोजगार मिळावा म्हणून हक्काने भांडतो. त्यामुळे तरुणांना मी त्यांच्यातला वाटतो. मी सर्वसामान्य जनतेच्या सुख दु:खात सहभागी होतो तर याचा काही लोकांना पोटसुळ उठतो. पण मी माझे काम सुरूच ठेवणार आहे. 

प्रतिष्ठानच्या माध्यमातून शासकीय योजनाचा फायदा मिळवून देण्यासाठी कायम प्रयत्न करणार आहे. शिवसेनेत मी प्रामणिक पणे काम केले. मात्र नगर -पारनेर मतदार संघाच्या लोकप्रतिनिधी च्या सांगण्यावरून मला शिवसेने मधून काढण्यात आले. जनतेला खरी स्थिती माहीत आहे त्यामुळे जनता पाठीशी खंबीरपणे उभी आहे.असेही लंके यावेळी म्हणाले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.