श्रीगोंद्यात वाळूतस्करांची मुजोरी, कारवाई टाळण्यासाठी आत्महत्येचा प्रयत्न.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा तालुक्यात वाळूतस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे.परंतु श्रीगोंदा तहसीलदार महेंद्र माळी यांनी मात्र या वाळूतस्करांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.मात्र तरीही वाळूतस्करांची मुजोरी काही कमी होत नाही. शनिवार दि.४ रोजी सांगवी दुमाला येथील बाळासाहेब घोगरे याने महसूल पथकाने त्याच्या वाळूवाहतूक करणाऱ्या ट्रक पकडला.

Loading...
ही कारवाई टाळण्यासाठी महसूल पथकाला धक्काबुक्की करत स्वत:च्याच वाहनावर डिझेल ओतून तो पेटवण्याचा प्रयत्न केला. तसेच विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला. याबाबत हिंगणी दुमालाचे तलाठी मापारी जयसिंग सुखदेव यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बाळासाहेब पोपट घोगरे व त्यांचा मुलगा अमोल बाळासाहेब घोगरे रा.सांगवी दुमाला व सदर वाहनावरील चालक (नाव माहीत नाही) यांनी वाळूने भरलेला ट्रक पळवून नेत अंदाजे ४ लाख ७६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पळवून नेल्याबद्दल शासकीय कामात अडथळा, आत्महत्येचा प्रयत्न करणे व चोरी केल्याप्रकरणी या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.