मोहटादेवीचा चांदीचा मुकूट अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी नेला चोरुन .


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील मोहटादेवी मंदिरातील देवीचा चांदीचा मुकूट चोरी गेला असून आश्वी पोलीस ठाण्यापासून अवघ्या २०० फूट अतंरावर हे मंदिर आहे.. आश्वी बुद्रुक बाजारतळा लगतहून जाणाऱ्या निमगावजाळी रस्त्यावर मोहटादेवीचे मंदिर असून देवीच्या डोक्यावरील १० हजार रुपये किंमतीचा चांदीचा मुकूट अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी चोरुन नेला आहे. 


Loading...
या मंदिराचे पुजारी राजू हरी काळे हे महावितरणमध्ये नोकरी करत असल्याने ते आश्वी खुर्द या ठिकणी राहत आहेत. गुरुवारी त्याचा मुलगा दर्शनाला आल्यानंतर देवीचा मुकूट चोरीला गेला असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पुजारी राजू हरी काळे यांनी आश्वी पोलीस ठाण्यात देवीचा मुकूट चोरी झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय उजे, हवालदार संजय लाटे हे करत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.