निंबळकच्या उपसरपंचासह आठ सदस्यांचा राजीनामा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आरक्षणाच्या मुद्दयावर राजीनामा सत्र चालू असतानाच, निंबळक येथील उपसरपंचसह आठ ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मराठा, मुस्लिम व धनगर समाजाला आरक्षण मिळण्याची मागणी करीत पदाचे राजीनामा देत असल्याचे राजीनामा पत्रात म्हटले आहे. 

Loading...
यामध्ये उपसरपंच घनशाम म्हस्के, माजी सरपंच विलास लामखडे, अशोक शिंदे, बाबासाहेब पगारे, सुभाष कोरडे, रुक्मिणी रोकडे, कमल कदम, रुपाली होळकर, ज्योती कोतकर यांचा समावेश असून, निंबळक ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत वरील सदस्यांनी राजीनाम्याचे पत्र ग्रामसेवक अनिल भाकरे यांच्याकडे सुपुर्द केले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.