आ.बाळासाहेब मुरकुटेंची गाडी 'वाघांनी' अडविली !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नेवासा शहरात रात्री सात वाजण्याच्या सुमारास अचानक नेवासा- श्रीरामपूर रोडवरील गणपती मंदिराजवळ आ. बाळासाहेब मुरकुटे यांची दुचाकी अडवून सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब वाघ यांनी जोरदार घोषणा देत राजीनामा देण्याची मागणी केली. या प्रकारामुळे शहरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.

Loading...
यावेळी वाघ यांनी सांगितले, की सध्या मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर मोर्चे निघत आहेत. या अनुषंगाने काल नेवासा शहरातदेखील मराठा समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. यात तालुक्यातील जनतेने सहभाग घेतला होता. आ. मुरकुटे यांचीदेखील जबाबदारी असताना ते मोर्चा सहभागी झाले नाहीत. त्यामुळे त्यांचा आम्ही निषेध करतो. या घटनेनंतर कोणतीही प्रतिक्रिया न देता आ. मुरकुटे निघून गेले, 

याचाही आम्ही निषेध करतो, राज्यात प्रत्येक लोकप्रतिनिधीची गाडी अडवून अशी प्रतिक्रिया विचारावी, असे आवाहन जनतेला करत आहे, असे वाघ म्हणाले. मुरकुटे यांची गाडी आडवल्याने शहरात मोठी चर्चा झाल्याने नेवासा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांनी सहकाऱ्यांसोबत जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.