पाथर्डीच्या माजी सभापती गहिनीनाथ शिरसाठना कारावास.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पाथर्डी तालुक्यातील टाकळीमानूर येथील यात्रेच्यावेळी झालेल्या वादावादीच्या रागातून एकाला मारहाण केल्याच्या आरोपावरून जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. बांबर्डे यांनी पाथर्डीचे माजी सभापती गहिनीनाथ शिरसाठ यांचेसह तिघांना दोषी धरून कारावासाची शिक्षा सुनावली. 

Loading...
या खटल्याची सविस्तर माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील टाकळी मानूर येथे दरवर्षी शहा-शरीफ बाबा देवस्थानची यात्रा असते. दि. ३/४/२०१४ रोजी रात्री १०.४५ वा. सुमारास सलीम रज्जाक शेख व गावातील अशोक शिरसाठ यांच्यात बाचाबाची झाली होती. याचा मनात राग धरून दि. ४/४/२०१४ रोजी सकाळी ८.३० वा. सुमारास सलीम शेख याला ग्रामपंचायत कार्यालयासमोर बोलावून आरोपी त्याला मारहाण करीत होते.

 त्यावेळी सलीम याचा आरडाओरडा ऐकूण फिर्यादी गोकुळ गाडे व मयत भुजंगराव गाडे हे सलीम यास मारहाणीतून सोडविण्यासाठी आले असता मयत भुजंगराव हे आरोपी गहिनीनाथ शिरसाठ यांना म्हणाले तुम्ही त्याला का मारता तो गरीब आहे, त्यावेळी आरोपी शिरसाठ मयत भुजंगराव यांना म्हणाले तुला पण आम्ही गावांमध्ये दवंडी देऊन मारून टाकू.

त्यावेळी मयत भुजंगराव म्हणाले मला भांडण करायचे नाही त्यावेळी मयत भुजंगराव यांना मनस्ताप झाला व ते चक्कर येऊन खाली पडले त्यावेळी त्यांना गोकुळ गाडे व इतरांनी दवाखान्यात नेले असता तेथे डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. 

याबाबत पाथर्डी पोलिस ठाण्यात गहिनीनाथ जगन्नाथ शिरसाठ, अशोक जगन्नाथ शिरसाठ व राजेंद्र जगन्नाथ शिरसाठ यांचे विरुद्ध गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाले. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. बांबर्डे यांचेसमोर झाली. 

यावेळी सरकार पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासले.त्यात आरोपी विरुद्ध पुरावा आल्याने न्यायालयाने आरोपी गहिनाथ शिरसाठ, अशोक शिरसाठ व राजेंद्र शिरसाठ यांना भादवि कलम ३२३ अन्वये दोषी सहा महिने शिक्षा व पाचशे रुपये दंड तसेच भादवी कलम ५०६ अन्वये एक वर्षे शिक्षा व पाचशे रुपये दंड, दंड न भरल्यास पंधरा दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.