कफ सिरपसह अनेक पेन किलरवर येणार बंदी ?


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केंद्र सरकार कफ सिरपसह अनेक पेन किलरवर बंदी आणण्याच्या तयारीत आहे. देशातल्या सर्वोच्च अशा ड्रग अॅडवायजरी बोर्डच्या उपसमितीच्या शिफारशीनुसार केंद्र सरकार निर्णय घेण्याचा विचार करत आहे. इकॉनॉमिक टाईम्सनं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.


Loading...
इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार देशातल्या जवळपास 300 औषधांवर आरोग्य मंत्रालय बंदी घालण्याची शक्यता आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय औषध बनवणाऱ्या कंपन्यांसोबत पिरामल, मॅक्सिऑड्स, सिप्ला आणि ल्यूपिनसारख्या घरगुती औषध निर्मात्या कंपनीच्या औषधांवर प्रभाव होणार आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.