बस दुर्घटनेचे गूढ वाढले, बचावलेल्या देसाईंवर संशयाची सुई.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आंबेनळी घाटात झालेल्या बस अपघाताचे गूढ वाढले असून या अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली जात आहे. या अपघातात गिम्हवणे गावातील सात जणांचा मृत्यू झाला असून मृत्युमुखी पडलेल्या या सात जणांचा एक मित्र असलेल्या संजय गुरव यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका पत्राद्वारे या अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. 

त्याशिवाय या भागाचे विद्यमान आमदार संजय कदम आणि माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनीही प्रसिद्धिमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना या अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी निघालेल्या दापाेली कृषी विद्यापीठाच्या ३४ कर्मचाऱ्यांची बस आंबेनळी येथे दरीत कोसळून ३३ जणांचा मृत्यू झाला हाेता. 
Loading...

या भीषण अपघातातून केवळ प्रकाश सावंत देसाई हे बचावले होते. त्यांच्यावरच आता संशयाची सुई राेखली गेली असून अपघाताच्या वेळी सावंत देसाई हेच गाडी चालवत होते का, असा संशय व्यक्त केला जात आहे. अपघाताच्या वेळी तेच गाडी चालवत असल्याचा संशय व्यक्त करत गाडी चालवताना अंदाज न अाल्यामुळे ती दरीत गेली असावी, असाही संशय या पत्रात व्यक्त करण्यात आला आहे. 

या अपघातात सावंत देसाई यांच्या अंगावर एकही अाेरखडा नाही. दरीत कोसळण्यापूर्वीच त्यांनी गाडीतून उडी घेतली असावी, असेही पत्रात म्हटले आहे. सावंत खालून वर कसे चढले? सावंत देसाई यांच्या दाव्यानुसार बस दरीत जात असताना पाहून त्यांनी हातात जे मिळेल ते पकडण्याचा प्रयत्न केला. 

मात्र, सामान्य व्यक्तीला हे सर्व क्षणार्धात करणे अशक्य अाहे. ही दरी भिंतीसारखी उभी असल्याने अपघातानंतर अनुभवी ट्रेकर्स, एनडीअारएफचे जवान दाेऱ्या बांधून खाली-वर ये- जा करत हाेते. मात्र, सावंत काेणत्याही अाधाराशिवाय पावसाने निसरड्या झालेल्या कड्यावरून फक्त मातीत बाेटे राेवत, झुडपे आणि गवत यांचा अाधार घेत कसे वर अाले, याबद्दल गुरव यांनी अाश्चर्य व्यक्त करत चौकशीची मागणी केली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.