धनगर आरक्षण आंदोलनाची दिशा आज चोंडीत ठरणार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जामखेड धनगर समाज आरक्षणप्रश्री होणाऱ्या आंदोलनाचे केंद्र चोंडी होणार आहे. आज चोंडी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बैठकीत धनगर समाजाच्या आंदोलनाची दिशा ठरणार आहे. समाजाच्या विविध संघटनांच्या माध्यमातून निघणाऱ्या तुळजापूर ते चोंडी पदयात्रेचा समारोपही चोंडीतच होणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे संस्थापक व माजी मंत्री अण्णा डांगे व या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आमदार अॅड. रामहरी रूपनर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी सकाळी ११ वाजता चोंडी येथे राज्यस्तरीय बैठक होत अाहे. या बैठकीला संघटनेचे राज्य कार्यकारिणी पदाधिकारी, मल्हार सेना, अहिल्या वाहिनी या सर्व आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. Loading...
या बैठकीत धनगर समाज आरक्षणासह अन्य महत्त्वपूर्ण प्रश्रांवर चर्चा होणार आहे. डांगे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. अॅड. रूपनर हे काँग्रेसचे नेते असून विधान परिषदेचे सदस्य आहेत. रूपनर यांनी गेल्या चार वर्षात धनगर समाज आरक्षणाचा प्रश्र अनेकवेळा सभागृहात पोटतिडकीने मांडून सर्वांचे लक्ष वेधले आहे. 

राष्ट्रवादीचे डांगे व काँग्रेसचे रूपनर एकत्र येत धनगर आरक्षणप्रश्री आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत. १५ ऑगस्टपूर्वी धनगर समाजास अनुसूचित जमातीचे (एसटी) जात प्रमाणपत्र वितरित व्हावे व चोंडी प्रकरणातील गंभीर स्वरूपाचे दाखल केलेले गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत, खोटे आश्वासन देऊन धनगर जमातीची फसवणूक करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा


या प्रमुख मागणीसाठी धनगर आरक्षण अंमलबजावणी समितीच्या वतीने १६ ते २८ ऑगस्टदरम्यान तुळजापूर ते चोंडी अशी २०० किलोमीटर अंतराची भाजप सरकार चले जाव यात्रा आयोजित करण्यात आली आहे.सुरेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा निघणार आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.