श्रीगोंद्यातील त्या महिलेची नाजूक संबंधातूनच हत्या,आरोपीस अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा शहराजवळील औटेवाडी येथे दि.३१ रोजी मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सुनील तुपे यांच्या पाण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात एका अनोळखी महिलेचा विवस्त्रावस्थेतील मृतदेह आढळला होता. या मृत महिलेच्या पायातील जोडव्यावरून पोलिसांनी या महिलेचा खुनी शोधला आहे.या प्रकरणी कजृत तालुक्यातील नागलवाडी येथील विटभट्टीमालक बाळासाहेब कल्याण बांदल याला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत सविस्तर असे की,औटेवाडी येथे दि.३१रोजी मंगळवारी सुनील तुपे यांच्या पाण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात एका अनोळखी महिलेचा विवस्त्रावस्थेतील मृतदेह आढळला होता. या महिलेच्या गळ्यातसाडीच्या तुकड्याने दगड बांधलेले होते. तसेच गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा होत्या. त्यावरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गु रं न३६६ भादवी कलम ३०२,२०१ नुसार अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला.

Loading...
पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा,अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील, शेवगाव पोलीस उपविभागीय अधिकारी अरुण जगताप यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या. त्यानुसार श्रीगोंदा पो निरीक्षक बाजीराव पोवार यांनी सहायक पो.निरीक्षक विठ्ठल पाटील,पो.हे.कॉ अंकुश ढवळे,पो.कॉ किरण बोराडे, उत्तम राऊत,प्रकाश वाघ,दादा टाके,संतोष कोपनर यांचे तपास पथक नेमले. 

सदर महिलेच्या मृतदेहावर एक बनावट सोन्याची आंगठी व चांदीचे जोडवे सापडले होते. पोलिसांसमोर सर्वप्रथम महिलेची ओळख पटवण्याचे आव्हान होते. त्यामुळे तपास पथकाने बीड जिल्ह्यातील आष्टी,कर्जत,जामखेड येथील पोलीस ठाण्यात जाऊन मिसिंग महिलेचा शोध घेतला तोपर्यंत पो नि पोवार यांनी मयत महिलेचे जोडवे श्रीगोंदा शहरातील एका ज्वेलर्सच्या दुकानात नेऊन त्यांच्या मदतीने या जोडव्यांवरील होलमार्कचा शोध घेतला असता.कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील कुमार काका ज्वेलर्स दुकान असल्याचे निष्पन्न झाले. 

त्यावरून पो नि पोवार यांनी सदर ज्वेलर्सकडे याबाबत चौकशी केली असता पोलिसांना काही गावांची नावे निष्पन्न झाले, तोपर्यंत मयत महिलेच्या वर्णनाशी मिळती जुळती एक तक्रार कर्जत पो.ठाण्यात दाखल झालेली होती. कर्जत तालुक्यातील नागलवाडी येथील रहिवासी असणारे बाबा साहेबराव डाडर यांनी दि.१ऑगस्ट रोजी त्यांची तीस वर्षीय पत्नी कविता बाबा डाडर या दि२८जुलै शनिवार रोजी गायब झाल्याची तक्रार दाखल केली होती. 

बाबा डाडर यांना श्रीगोंदा पोलिसांनी मयत महिलेच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या वस्तू दाखवल्या असता त्यावरून सदर मयत महिला ही आपली पत्नी कविता डाडर हीच असल्याचे सांगितले. मयत महिला कविता ही त्यांच्याच गावातील नागलवाडी येथील बाळासाहेब कल्याण बांदल (वय ५०) यांच्या विटभट्टीवर मजुरी काम करत होती.

अशी माहिती समजल्यामुळे पोलिसांनी संशयावरून विटभट्टीमालक बाळासाहेब कल्याण बांदल रा.नागलवाडी,ता कर्जत याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्याने मयत कविता डाडर ही आपल्याकडे वीटभट्टीवर कामावर येत होती तेव्हा तिचे आणि माझे प्रेम संबंध,जुळले होते आणि त्यातूनच तिला मी कामापोटी सव्वा लाख रुपये उचल दिली होती. 

ते पैसे परत मागितल्यावर कविता ही टाळाटाळ करत होती. तसेच ती सतत कुणाशी तरी फोनवर बोलायची त्यावरून माझा तिच्यावर संशय बळावला होता. दि.२८ शनिवारी रोजी दुपारी मयत महिला बाळासाहेब बांदलसोबत श्रीगोंद्याकडे जाण्यासाठी त्याच्याच दुचाकीवरून निघाले यावेळी घायपातवाडी जंगलाजवळ आल्यानंतर बांदल याने कविता हिला पैशांची मागणी केली असता. 

तिने पैसे देण्यास नकार दिला.यावरून त्या दोघांत वाद झाले आणि त्यातून बांदल याने सोबत आणलेल्या चाकूने कविताच्या गळ्यावर वार करून तिचा खून करून तिचा मृतदेह औटेवाडी तलावातील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात आणून टाकला.अशी माहिती आरोपी बाळासाहेब कल्याण बांदल याने देत, घटनास्थळी याबाबत पोलिसांना गुन्ह्याचे प्रात्यक्षिक देखील करून दाखवले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.