कामवाल्या बाईचा पगार निश्चित, एक रुपयाही कमी दिला तर जावे लागणार तुरुंगात!


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- तामिळनाडूत कामवाल्या बाईचा पगार निश्चित करण्यात आलेला आहे. तिला प्रतितास ३७ रुपयांच्या हिशेबाने पगार द्यावा लागणार आहे. यात एक रुपया जरी कमी पगार दिल्यास जेलची हवा खावी लागणार आहे. हा नियम घरात झाडलोट आणि धुणी-भांडी करणाऱ्या कामवाल्या महिलांसाठी लागू आहे.

तिला प्रतितास ३७ रुपयांच्या हिशेबाने पगार द्यावा लागणार आहे. यात एक रुपया जरी कमी पगार दिल्यास जेलची हवा खावी लागणार आहे. हा नियम घरात झाडलोट आणि धुणी-भांडी करणाऱ्या कामवाल्या महिलांसाठी लागू आहे.. तामिळनाडू सरकारने कामवाल्यांच्या अधिकारासाठी असंघटित क्षेत्रात कामगारांसाठी सुधारणा लागू केलेल्या आहेत. 
Loading...

अप्रशिक्षित घरगुती कामवाल्या महिलांसाठी किमान ३७ रुपये प्रतितास हिशेबाने पगार देणे आवश्यक आहे, तर प्रशिक्षित कामवाल्या कामगार महिलांना ३९ रुपयांच्या प्रतितास हिशेबाने पगार देणे आवश्यक असेल, यात नर्स, माळी आणि इतर प्रशिक्षित काम करणाऱ्या महिलांचा समावेश असणार आहे. नवीन कायद्यानुसार आठ तासांसाठी घरात कपडे, धुणी-भांडी आणि झाडलोट करणाऱ्या तसेच मुलाची देखभाल करणाऱ्या महिलांना कमीत कमी ६,८३६ रुपये प्रतिमहिना द्यावे लागणार आहेत.

तर घरामध्ये प्रशिक्षित असलेल्या कामवाल्यांना कमीत कमी ८,०५१ रुपये इतका पगार देणे आवश्यक आहे. घरगुती कामवाले हे प्रशिक्षित असोत किंवा नसोत, ते मालकासोबतच राहतात, त्यांना १० टक्के जास्त पगार दिला जावा, त्याचबरोबर जेवण, क पडे आणि राहण्याची स्वतंत्र सुविधा द्यावी, अशी तरतूद आहे. 

कोइम्बतूरच्या उपायुक्तांच्या नेतृत्वाखालील आठ सदस्यीय समितीने शिफारस केलेली होती. या शिफारशी करण्यापूर्वी दहा जिल्ह्यांत जाऊन सलग सहा महिने कामगार लोकांच्या मुलाखती घेतलेल्या होत्या व कामगार संघटनांशी चर्चा केलेली होती. सरकारच्या या निर्णयाचा जवळपास १८ लाख लोकांना फायदा होणार आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.