छिंदमला तडीपार करण्याची मागणी,अशांतता निर्माण झाल्यास त्यास पोलिसच जबाबदार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत शिवभक्तांचे मने दुखावणाऱ्या व महाराष्ट्रात अशांतता निर्माण करणाऱ्या श्रीपाद छिंदमला पोलीसांनीच मोठया फौजफाटयासह महापालिकेत प्रवेश दिला. त्याच्या निषेधार्थ छिंदमला राज्याबाहेर तडीपार करण्याची मागणी युवा सेनेच्यावतीने जिल्हाप्रमुख नगरसेवक विक्रम राठोड यांनी निवेदनाद्वारे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे केली.
Loading...

याप्रसंगी शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा आशा निंबाळकर, मदन आढाव, अभिषेक भोसले, मृणाल भिंगारदिवे, आप्पा नळकांडे, महिला शहरप्रमुख अरुणा गोयल, उषा ओझा, विजय पठारे, सुमित धेंड, निखील होगले, अवधूत फुलसौदर, अक्षय नागापुरे, किरण अग्रवाल, प्रशांत गायकवाड, प्रशांत भाले, जय बिडकर आदि उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की, छिंदमने शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्रात त्याचे तीव्र पडसाद उमटले. विविध ठिकाणी आंदोलने करत त्याला तडीपार करण्याची मागणी झाली. तरीही पोलीस प्रशासन त्याला संरक्षण देऊन पुढील काळात अशांतता निर्माण करत असल्याचा आरोप करत गुरुवार दि.२ रोजी पोलिसांनी छिंदमला महापालिकेत प्रवेश करण्यासाठी पोलिस प्रशासनाने संरक्षण देत जनतेच्या भावना मोठ्या प्रमाणात दुखावण्याचे काम केले असल्याचे म्हटले आहे. यापुढील काळात अशांतता निर्माण झाल्यास त्यास पोलिसच जबाबदार राहील असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.