संदीप कोतकर व सचिन कोतकरच्या जामीन अर्ज सुनावणीस नकार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अशोक लांडे खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेले संदीप कोतकर व सचिन कोतकर यांचे वतीने मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठात जामीनासाठी अर्ज दाखल केले असता सदर अर्ज चालविण्यास न्या.गवई व न्या.कोतवाल यांचे कोर्टाने नकार देवून सदर अर्ज न्या. ओक यांचेसमोर चालवावेत असे आदेश पारित केले, अशी माहिती या गुन्ह्यातील मुळ फिर्यादी शंकरराव राऊत यांनी दिली.

शेवगाव येथील लॉटरी विक्रेता अशोक भिमराज लांडे यांचा दि. १९/५/२००८ रोजी मारहाण करुन खून केला. सदर मोटार अपघात झाल्याचे भासविले. याबाबत फिर्यादी शंकरराव राऊत यांनी कोर्टात खाजगी फिॅर्याद दाखल केल्यावर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 


Loading...
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस अधिक्षक कृष्णप्रकाश यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस अधिक्षक ज्योती प्रियासिंग यांनी करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सदर खटल्याची सुनावणी नाशिक सत्र न्यायालयात वर्ग होवून यातील आरोपींना दि. ११/४/२०१६ रोजी जन्मठेपीची शिक्षा झाली. त्यानंतर संदीप, सचिन व अमोल कोतकर यांनी हायकोर्टात अपील करुन त्यात जामीन अर्ज दाखल केले. 

त्यावर न्या. अभय ओक व न्या. सय्यद यांचे समोर सुनावणी होवून सदर जामीन अर्ज फेटाळले. दरम्यान, या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी भानुदास कोतकर यांना मेडिकल बेल मिळाला होता. या गुन्ह्यातील न्यायबंदी सचिन कोतकर व संदीप कोतकर यांनी हायकोर्टात दि. २७/७/२०१८ रोजी जामीन अर्ज दाखल केले. 

सदर अर्ज न्या. भूषण गवई व न्या. सारंग कोतवाल यांचेसमोर सुनावणीस आले असता. पूर्वीदि. २७/९/२०१६ साली या आरोपींचे अर्ज न्या. अभय ओक व न्या. सय्यद यांनी फेटाळले होते. त्यामुळे या दोन्ही अर्जात काम पाहण्यास नकार देवून न्या. ओक यांचेसमोर ते अर्ज चालवावेत असे आदेश पारित केले आहेत.याबाबत विविध प्रकरणांमध्ये सुप्रीम कोर्टाचेही त्याच पूर्वीच्या न्यायमूर्ती समोर असे पुन्हा आलेले अर्ज चालवावेत असे निर्देश आहे. या निर्णयाने कोतकर बंधूना मोठा झटका बसला आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.