नितीन उदमले यांचा भाजप मध्ये प्रवेश.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक नितीन उदमले यांनी काल दिल्ली येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व भाजप अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. 

नितीन उदमले पहिल्या प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून वर्ग एक अधिकारी झाले होते त्यानंतर  गटविकास अधिकारी ,पारनेर तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी ,जि.प.लातूर या पदांवर त्यांनी प्रभावी काम केले असून सन 2014 ची लोकसभा निवडणूक शिर्डी मतदारसंघातून लढवली होती.

केंद्रातील नरेंद्र मोदी व राज्यातील देवेन्द फडणवीस यांचे सरकार अत्यंत प्रभावीपणे राष्ट्र निर्मितीचे कार्य करीत आहे. त्यामुळे माझ्या सारख्या तरुण कार्यकर्त्यां मध्ये काम करण्याची नवी उमेद निर्माण झाली असून या प्रक्रियेत आपलेही योगदान असावे या भूमिकेतून भाजपा चा विचार व कार्य समाजात पोहचवण्यासाठी पुढील जीवनभर कार्यरत राहणार आहे.असल्याचे त्यांनी अहमदनगर लाइव्हसोबत बोलताना सांगितले. 

''मी स्वतः कृषी पदवीधर असून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांशी अवगत आहे . शेती आणि शेतकऱ्याच्या संदर्भात मोदीजी आणि देवेन्द्रजी यांची भूमिका अतिशय सकारात्मक असून देशातील शेतकऱ्यांचे जीवन सुखीसमृद्ध व्हावे यासाठीचे त्यांचे प्रयत्न अधिक प्रभावी करण्यासाठी मी कार्यरत राहील. तसेच सामाजिक दृष्टया तळातील वर्गासाठी , भटक्या विमुक्त समाजासाठी माझे असणारे स्वप्न मी केवळ मा. देवेंद्रजी व मा. दानवेजी च्या माध्यमातूनच पूर्ण करू शकतो असा विश्वास मला वाटतो . देशातील तरुण पिढीला एक राजकीय आदर्श म्हणून देवेन्द्रजी चे नेतृत्व पुढे येत आहे त्यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली माझ्या प्रशासनातील अनुभवाचा उपयोग समाजात चांगले काम उभारण्या साठी करण्याचा संकल्प केला आहे. या माझ्या प्रयत्नात मला आपल्या सहकार्याची नितांत आवश्यकता असून आपण ते कराल असा विश्वास वाटतो .- नितीन उदमले

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.