जगातले यशस्वी लोक रोज करतात ही कामं !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- तरुणांच्या स्वप्नांपुढे आकाशही ढेंगणं वाटायला लागतं. आयुष्याच्या या टप्प्यात अनेकजण नानाविध सल्लेही देत असतात. पण यामुळेच बऱ्याचदा तरुणपिढी संभ्रमीत दिसते. नक्की आयुष्यात काय करायला हवं हेच त्यांना कळत नाही. आज आम्ही तुम्हाला अशा यशस्वी १० लोकांच्या सवयींबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्ही अंगीकारल्या तर त्याचा नक्कीच फायदा होईल.जे.के. रॉलिंग- हॅरी पॉटर सीरिज प्रसिद्ध होण्यापूर्वी रॉलिंगकडे अयशस्वी व्यक्ती म्हणूनच पाहिलं जायचं. नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून रॉलिंगने त्याच्यापासून घटस्फोट घेतला. गरीब लोकांना ब्रिटीश सरकारकडून मिळणाऱ्या पैशांवर ती स्वतःचं पोट भरत होती. यशस्वी होण्यापूर्वी तिच्या वाटेला फक्त अवहेलनाच आली. पण नेमकी याच अवहेलनेने आणि अपयशाने तिला खूप काही शिकवले. कामात सातत्य ठेवत तिने अखेर यशाची चव चाखलीच.Loading...
स्टीव्ह जॉब्स- अप्पल कंपनीना सर्वोच्च स्थानी घेऊन जाणाऱ्या जॉब्सच्या यशाचा मंत्र होता की, स्वतःपेक्षा मोठ्या धैर्यासाठी काम करा. अशा धैर्याचा ध्यास घ्या जो तुम्हाला सर्वोत्तम काम करायला प्रवृत्त करेल. त्याचा दुसरा मंत्र होता की आपण समाजाचं देणं लागतो. त्यामुळे समाजाला उपयोग होईल अशा गोष्टी करणं.

बिल गेट्स- मायक्रोसॉफ्टचे सह- संस्थापक यांचा पटकन मिळणाऱ्या यशावर विश्वास नाही. ते नेहमी त्याच गोष्टींमध्ये गुंतवणूक करतात जिथे मोठ्या काळासाठी यश मिळेल आणि टिकेल. तसेच समाजासाठी दानधर्म करायलाही त्यांना आवडते. या कृतीतून त्यांना ताकद मिळते असे त्यांना अनेक मुलाखतीत सांगितले आहे.


रिचर्ड ब्रँसन- वर्जिन ग्रुपचे संस्थापक रिचर्ड त्यांच्या आईच्या सल्ल्याला नेहमी प्राधान्य देतात. अपयशातून शिकत पुढे जात राहतात. पदरी आलेल्या अपयशाचाच विचार करत ते बसत नाहीत.


सिंथिया टिडवेल- रॉयल नेबर्स ऑफ अमेरिका या विमा कंपनीचे सीईओ सिंथिया यांच्यामते, आयुष्यात धोका पत्करुनच यश मिळू शकते. तरुण पिढी रिस्क घेऊ शकते, त्यामुळे त्यांनी सर्व बाबींचा विचार करुन रिस्क घ्यावी.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.