कतरिनानं दिला सलमान खानला 'होकार'


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- 'भारत'मध्ये आता आपल्याला कतरिना आणि सलमान खान दिसणार आहे. प्रियांकाचा विषय आता संपलाय. कॅट आणि सलमानचं प्रेम पुन्हा बहरणार असं दिसतंय. कारण सलमाननं फेसबुकवर सुशील कन्या असा कतरिनाचा उल्लेख केला होता. आता भारतसाठी तर प्रियांका नक्की झाली होती. 

Loading...
ऐनवेळी कतरिनाला विचारलं आणि तिनं कुठलाच इगो प्राॅब्लेम न आणता पटकन हो म्हटलं. कॅटनं अचानक सलमानला होकार का दिला असेल? याबद्दल कॅट सांगते, 'अली अब्बास जफर आणि माझी खूप चांगली मैत्री आहे. 'मेरे ब्रदर की दुल्हन' आणि 'टाइगर जिंदा है' हे सिनेमे आम्ही एकत्र केलेत. 

ते खूप चांगले चाललेत. मग ऐनवेळी मला विचारलं, रिप्लेसमेंट केली असे विचार मी का आणायचे?' ती म्हणते, ' मी भारतचं पूर्ण स्क्रीप्ट वाचलं. माझी भूमिका काय आहे ते पाहिलं. ते सगळंच खूप दमदार आहे. म्हणून मी ही भूमिका स्वीकारली. '
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.