चिमुरडीच्या अपहरण प्रकरणी ग्रामस्थ आक्रमक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- बारागाव नांदूर येथे ७ वर्षीय चिमुरडीला घरातून उचलून नेल्याप्रकरणी ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत संताप व्यक्त केला. पो. नि.अविनाश शिळीमकर यांनी गावात दाखल होत संतप्त ग्रामस्थांची समजूत काढत गावात पोलिस चौकी देत गुन्हेगारी मुक्त गावाचे ग्रामस्थांना आश्‍वासन दिले. बारागाव नांदूर येथील अमजत हसन सय्यद यांच्या ७ वर्षाच्या चिमुरडीला राहत्या घरातून उचलून नेण्यात आले होते. 

Loading...
दि. १ ऑगस्ट रोजी पहाटेच्या वेळी घरातून मुलीला उचलून नेल्यानंतर मुलीने अपहरणकर्त्याला चावा घेत स्वत:ची सुटका करून घेतली होती. पहाटेच्या वेळी घरी परतलेल्या चिमुरडीने घडलेला प्रसंग आई वडिलांना सांगितला. यानंतर वडील अमजत सय्यद व आई यास्मीन सय्यद यांनी पोलिस ठाणे गाठत तक्रार केली असता पोलिसांनी एकास चौकशीसाठी ताब्यात घेतले. 

चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी ४० ते ५० जणांचा जमाव करून अचानकपणे पिडीत मुलीचे वडील अमजत सय्यद यांच्या हॉटेलवर हल्ला चढविला. याप्रसंगी दोन ते तीन जणांना मारहाणही केली. दहशतीखाली आलेल्या अमजत सय्यद यांनी गुन्हा न नोंदवता पोलिस ठाण्यातून काढता पाय घेतला. 

या घटनेची माहिती गावात समजताच सर्व व्यापा‍ऱ्यांनी व ग्रामस्थांनी गाव बंद ठेऊन निषेध नोंदविण्याचा निर्णय घेतला.यावेळी जि.प.सदस्य शिवाजी गाडे यांनी गावात जर कोणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याचा बिमोड करण्यास आम्ही समर्थ आहोत. १० वर्षांपूर्वी गावात राहण्यास आलेल्यांची यादी तयार करून प्रत्येकाची चौकशी करण्याचा निर्णय गाडे यांनी केला. 

तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी पवार यांनी पोलिसांनी सहकार्य केल्यास गावातील गुन्हेगारांचा बिमोड करू असे सांगितले. पो.नि. शिळीमकर यांनी बारागाव नांदूरच नव्हे तर संपूर्ण तालुक्यातील गुन्हेगारी संपूष्टात आणली जाणार आहे. . बारागाव नांदूर गावाकडून सहकार्याची खात्री झाल्याने आता कोणत्याही परिस्थितीत तालुक्यात शांतता प्रस्थापित केल्याशिवाय माघार घेतली जाणार नाही असे सांगत घडलेल्या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्याचे आश्‍वासन दिले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.