शिर्डीत स्कूल बसच्या धडकेने एकाचा जागीच मृत्यू

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केलवड येथे मुलीला भेटण्यासाठी जाणाऱ्या वैजापूर येथील दुचाकी स्वारास शिर्डीत नगर-मनमाड रस्त्यावर हॉटेल गंगोत्रीसमोर स्कुलबसने जोराची धडक दिल्याने संभाजी पवार यांच्या जागीच मृत्यु झाला. तर आप्पासाहेब मोईन हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर साईबाबा रुग्णालयात उपचार चालू आहेत.


याबाबत अधिक माहीती अशी, गुरुवार दि. २ रोजी सकाळच्या सुमारास वैजापूर येथून केलवडकडे मुलीना भेटण्यासाठी संभाजी पवार, आप्पासाहेब मोईन हे मोटाससायकल क्रमांक एम.एच. २०- ९६८२ वरुन जात असताना गंगोत्री हॉटेल समोर कोळपेवाडी येथील गौतम पब्लिक स्कूलची बस क्रमांक एम.एच. १७-बी.डी. ४३३३ या बसचा धक्का लागून संभाजी पवार यांच्या डोक्यावरून बसचे चाक गेल्याने ते जागीच ठार झाले आहे. 

Loading...
तर अप्पासाहेब मोईन हे गंभीर जखमी झाले असून त्यांना साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.बसचालकास शिर्डी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शिर्डी बसस्थानक दरम्यान मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक करणाऱ्या ॲपेरिक्षा उभ्या राहतात.

याठिकाणी रस्त्याच्या कडेला मोठ्या संख्येने प्रवासी वाहतूक करणारी वाहने थेट रस्त्यातच उभी केली जात असल्याने या ठिकाणाहून वाहनधारकांना जीव मुठीत धरुन चालावे लागते. ॲपेचालकांची दादागीरी असल्याने सर्रासपणे उर्मटपणाची उत्तरे देऊन त्यांना हटकणाऱ्यांना दमबाजी करतात. 

चौकात नेमलेले वाहतुक पोलीस तिनचाकी रिक्षा किंवा ट्रॅव्हल्स कार्यालयात बसून आपली ड्युटी बजावत असतात. चौकात होणारी वाहनांची कोंडी तसेच दररोज होणारे किरकोळ अपघात टाळण्यासाठी चौक ते बसस्थानक दरम्यान नो पार्किंग झोन म्हणून घोषित करावा या ठिकाणी उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करावी अशी मागणी साईभक्त व शिर्डीकरांतून केली जात आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.