आमदार जितेंद्र आव्हाडांसह चौघे नालासोपारा आरोपींच्या टार्गेटवर.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नालासोपार स्फोटक प्रकरणात आज एटीएसने मुंबई सत्र न्यायालयात खळबळजनक माहिती उघड केली आहे. नालासोपारा स्फोटक प्रकरणात अटक केलेल्या 5 आरोपींच्या रडारवर आणखी चार लोकांची नाव असल्याची माहिती एटीएसनं न्यायालयासमोर दिली आहे. 
Loading...

यात मुक्ता दाभोळकर, श्याम मानव, जितेंद्र आव्हाड आणि रितूराज ही मंडळी नालासोपारा आरोपींच्या टार्गेटवर असल्याचा दावा एटीएसने केला आहे. दरम्यान, नालासोपारा स्फोटक प्रकरणाचा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येशी संबंध असल्याने एटीएसच्या कोठडीत असलेल्या शरद कळसकर याची आणि सीबीआय कोठडीत असलेल्या सचिन अंदुरे याची समोरसमोर चौकशीसाठी सीबीआय प्रयत्न करतेय. 

सीबीआयनं मुंबईतील सेशन्स कोर्टाकडे यासाठी परवानगी मागितली आहे. काल पुणे सीबीआय कोर्टाने अंदुरेची पोलीस कोठडी १ सप्टेंबरपर्यंत वाढवून दिली आहे. तर मुंबई सेशन्स कोर्टाने शरद कळसकरची पोलीस कोठडी ३ सप्टेंबरपर्यंत वाढवली. पण डॉक्टर दाभोलकर हत्याप्रकरणी त्याचा ताबा सीबीआयला देण्यास नकार दिला होता. 

त्यानंतर कळसकरला पुण्याला नेणं शक्य नसल्यानं आता अंदुरेला मुंबईत आणून कळसकरसोबत समोरासमोर चौकशी करण्याचा सीबीआयचा प्रयत्न आहे आणि त्यासाठीच ही परवानगी सीबीआयकडून कार्टाकडे मागण्यात आली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.