संगमनेर-आश्वी रस्त्यावरील अपघातात एकाचा मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील उंबरी-बाळापूर येथिल रहिवासी एकनाथ ज्ञानदेव उंबरकर (वय ४८) यांचा बुधवार रोजी सकाळी जोर्वेमार्गे जाणाऱ्या संगमनेर-आश्वी रस्त्यावर झालेल्या अपघातात जबरी जखमी झाल्यानंतर रुग्णालयात उपचार सुरु असताना दुर्दैवी मृत्यु झाला आहे.
Loading...

एकनाथ उंबरकर हे बुधवारी सकाळी जोवेमार्गे संगमनेरच्या दिशेने दुचाकीवरुन चालले होते. त्यावेळी संगमनेरहून येत असलेल्या एसटी बसची जोरदार धडक त्यांना बसली. मोठा आवाज झाल्याने स्थानिक नागरीकांनी धाव घेत उंबरकर यांना संगमनेर येथिल रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात उपचार सुरु असताना एकनाथ उंबरकर यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. 


त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, जावई, आई, वडील, भाऊ, भावजय असा मोठा परीवार असून एकनाथ उंबरकर हे अतिशय मनमिळावु स्वभावाचे व नेहमी दुसऱ्याच्या मदतीला धावुन जाणारे व्यक्तीमत्व असल्याने त्यांच्या अपघाती निधनामुळे उंबरी-बाळापूर पंचक्रोशीत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.