महापालिकेच्या दुर्लक्षामुळे बुरुडगाव अविकसित : गांधी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर शहरापासून बुरुडगांव जवळ असले तरी महापालिकेच्या दुर्लक्षामुळे अविकसित राहील आहे. बुरुडगांव महापालिकेत असतांनाही व आता वगळलेले असतांनाही महापालिका सातत्याने बुरुडगांववर अन्यायच करत आहे. पाणी हे प्रत्येकाचा अविभाज्य घटक असल्याने प्रत्येकाला पाणी मिळणे हा हक्क आहे. 


Loading...
मात्र महापालिकेने बुरुडगांवचे पाणी तोडून राजकारण केले आहे. हा पाणी पुरवठा पुन्हा सुरळीत व्हावा, यासाठी खासदार दिलीप गांधी यांच्यासमवेत आयुक्तांबरोबर बैठक घेऊन प्रश्­न सोडविण्यासाठी प्रयत्न करु, मात्र यासाठी गावकऱ्यांचाही पुढाकार व सहकार्य महत्वाचे असून, थकबाकी पाणीपट्टी भरण्यासाठी गावाची सकारात्मक भुमिका आवश्यक आहे. 

खा.दिलीप गांधी यांनी बुरुडगांवला भरपूर विकास निधी दिला आहे. या विकास निधीतून गावातील मुलभूत प्रश्­न मार्गी लागले असल्याने बुरुडगांवचा चेहरा बदलत असल्याचे नगरसेवक सुवेंद्र गांधी म्हणाले.


बुरुडगांवचे उपसरपंच ज्ञानेश्­वर जंगम यांच्या पाठपुरवठयामुळे खा. गांधी यांनी स्थानिक विकास निधीतून बुरुगांवमधील मंजुर केलेल्या मुस्लिम स्मशानभुमी संरक्षक भिंत, समाज मंदिर सभागृह तसेच बुरुडगांमधील पाण्याची टाकी ते हायस्कूल रस्ता कॉक्रीटीकरण व मजबूतीकरण आदि विकास कामांचा शुभारंभ मनपा गटनेते सुवेंद्र गांधी यांच्या हस्ते झाले. 


यावेळी पं.स.सदस्य स्वाती कार्ले, सरपंच शालिनी क्षेत्रे, उपसरपंच ज्ञानेश्­वर जंगम, राजेंद्र क्षेत्रे, जब्बार शेख, भाऊसाहेब कुलट, बापूसाहेब कुलट, ग्रामपंचायत सदस्य खंडू काळे, शाम पटेकर, बाळासाहेब साबळे, नवनाथ वाघ, भागिनाथ कदम, अप्पा कुलट आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.