हरकतीपेक्षा 'त्यांना' पत्रकबाजीतच रस-थोरात


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- गेल्या दहा वर्षात त्यांच्या आमदारकीच्या काळात सन २००५ च्या समन्यायी पाणी वाटप कायद्यान्वये  गोदावरी कालव्यांचे पाणी घालविले. त्यांच्याच कारकिर्दीत भूजल कायदे झाले मात्र त्याचे नियम त्यांना अस्तित्वात आणता आले नाही. ही वस्तुस्थिती असताना विरोधक आपल्या अकलेचे तारे तोडुन त्याचे खापर आ.कोल्हेंवर फोडत शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवीत आहेत. याउलट या भूजल कायद्यासंदर्भात अभ्यास करून त्याबाबत हरकती सादर करण्यापेक्षा त्याला राजकीय स्वरूप देवून पत्रकबाजी करण्यात ते धन्यता मानीत आहे,असा टोला आशूतोष काळे यांचे नाव न घेता भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद थोरात यांनी लगावला आहे.

Loading...
प्रसिध्दीपत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने भूजल संरक्षणार्थ यापुर्वी पारित झालेल्या कायद्याला नियमावली अस्तित्वात नव्हती ती तयार करून त्याला शेतकज्याकडून हरकती मागविल्या आहेत. त्याबाबत आ.स्नेहलता कोल्हे यांनी मंत्रालय, विधीमंडळ, अधिवेशन व पाणी पुरवठा तसेच जलसंपदा मंत्रीस्तरावर अभ्यास करून आवश्यक त्या ठिकाणी बदल करण्याबाबत सुचना केलेल्या आहेत. शेतकऱ्यांचे हितच त्या पहात आहेत. भूजल कायद्यासंदर्भात बनविलेल्या नियमावलीचा अभ्यास करून त्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडे सादर करावयाच्या आहेत. असे असताना विरोधक त्यासंदर्भात अकारण राजकारण करीत आहेत. 

पाणी उपलब्ध करून ते केवळ भाजपा सेनेच्याच शेतकऱ्यांना मिळावे असे धोरण आ. स्नेहलता कोल्हे यांनी कधीही घेतले नाही. उलट शेतकऱ्यांचे प्रश्न त्या तळमळीने सोडवित आहेत. तुटीच्या उर्ध्व गोदावरी खोऱ्यात वैतरणेचे समुद्राला वाया जाणारे पाणी वळविण्याबाबत शासन निर्णय करून त्याबाबत पावले उचलली आहेत. स्वत:च्या मतदार संघात शेतकऱ्यांचा राज्यव्यापी संप सुरू असताना तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नेवुन एका महिला लोकप्रतिनिधीने सोडविण्यासाठी उचललेली पावले विरोधकांना अजुनही सहन झालेली नाही. '

उलट केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव देवुन गेली साठ वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न सोडविण्यासाठी पावले उचलली आहेत. तेव्हा विरोधकांनी उगाचच वड्याचे तेल वांग्यावर काढुन भुजल कायद्याच्या नियमासंदर्भात अकलेचे तारे तोडुन आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे कसे आहोत हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये, असेही शरद थोरात यांनी म्हटले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.