जामखेडमध्ये अनोळखी तरुणाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जामखेड तालुक्यातील डोणगाव येथील वनविभागाच्या जंगलात एका अनोळखी तरुणाचा जळालेला मृतदेह आढळल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी मृत व्यक्तीची ओळख पटेल असा कसलाही पुरावा न ठेवल्याने मृतदेहाची ओळख पटू शकली नाही. 


Loading...
त्यामुळे आता पोलिस या बाबत काय आणि कसा तपास लावतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. . या बाबत मिळालेली माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील डोणगाव येथे सकाळी हरीनारायण आष्टा येथील एका दुधवाल्यास एक अनोळखी पुरुष जातीचा जळालेला मृतदेह डोणगाव येथील वनविभागाच्या जंगलात दिसला. 

त्याने ताबडतोब ही घटना डोणगावचे पोलीस पाटील बिभीषण यादव यांना कळवली. त्यांनी ही घटना जामखेडचे पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांना कळवली. त्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पहाणी केली असता, सदरच्या अनोळखी व्यक्तीचा मुख्य रस्त्याला लागून असलेल्या पडीक शेतात धारधार शस्त्राने मारहाण करून खून करण्यात आला. 


यानंतर सदरचा मृतदेह तीनशे फूट ओढत नेत जवळच असलेल्या वनविभागाच्या जंगलात फेकून दिला. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून अज्ञात मारेकऱ्यांनी त्या व्यक्तीच्या अंगावर पेट्रोलजन्य पदार्थ टाकून जाळून टाकले. यामुळे मृतदेहाचा चेहरा विद्रूप झाला असल्याने चेहरा ओळखु येत नव्हता. मयत इसमाची ओळख पटवण्याबरोबरच मारेकऱ्यांना शोधण्यासाठी जामखेड पोलिसांचे पथक तपास करत आहेत.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.