नगरमध्ये २७ लाखांची खंडणी मागणारा अटकेत.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- व्यावसायिकास २७ लाख रुपयांची खंडणी मागून १ लाख रुपयांची रक्कम मार्केट यार्ड परिसरात स्विकारताना कैलास बापुराव शिंदे याला ताब्यात घेण्याची कारवाई पोलिस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके व त्यांच्या पथकाने केली आहे. 


Loading...
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कैलास शिंदे(रा. ठाकूर गल्ली, अहमदनगर) याने कल्पेश अमरसिंग परदेशी (रा. भराडगल्ली, चितळेरोड, अ.नगर) या व्यावयायिकाचे हॉटेल हे अनधिकृत जागेत बांधले असल्याचा तक्रारी अर्ज जिल्हादंडाधिकारी अ.नगर यांना दिला होता. सदरचा अर्ज जिल्हादंडाधिकारी नगर यांचेकडून अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग यांचेकडे वर्ग करण्यात आला होता. 

सदरचा तक्रारी अर्ज मागे घेणेकामी दि. २० ऑगस्ट २०१८ रोजी ५० लाख रुपयांची तडजोड करावी लागेल असा निरोप पाठविला. त्यानंतर दि. २३ रोजी ३१ लाखांची मागणी केली होती. त्यानंतर दि. २७ रोजी दुपारी ४ वा. तडजोडीच्या रकमेपैकी १ लाखाचे टोकन देण्याचे ठरले. 

त्यानंतर दि. २९ रोजी कोठी रोड, मार्केटयार्ड येथे असलेले बालाजी ट्रॅव्हल्स या ऑफिसमध्ये २७ लाखाची खंडणी मागणारा कैलास शिंदे टोकनचे १ लाख रुपये पंचासमक्ष स्वीकारताना जेरबंद करुन त्याला अटक करण्यात आली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.