अनैतिक संबंधाला अडसर येत असल्याने प्रियकरच्या मदतीने पतीचा खून.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अनैतिक संबंधाला अडसर येत असल्याने प्रियकरच्या मदतीने पत्नीने पतीचा खून केल्याची घटना कोपरगाव तालुक्यात कोळपेवाडी परिसरात सुरेगाव शिवारात घडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोनजणांना अटक केली असून न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती तालुका पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे यांनी दिली.
Loading...

अनिल बाबासाहेब घुसळे (वय ३६, रा. सुरेगाव, ता. कोपरगाव) असे मयताचे नाव आहे. बाळू दिलीप खंडवे (वय २६) व विलास पुंजाराम कुवारे (वय ४१, दोघे रा. सुरेगाव) या दोघांचा आरोपींमध्ये समावेश आहे. याबाबातची पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रमा अनिल घुसळे व बाळू खंडवे या दोघांमध्ये अनैतिक संबंध होते. 


यास मयत पती अनिल हा अडचण ठरत असल्याने रमाच्या सांगण्यावरून वरील आरोपींनी दि. २५ ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता अनिलला घरातून बोलावून त्याचा कशाने तरी गळा आवळून खून केला. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे पे्रत अर्जुन शेळके (रा. कोळपेवाडी) यांच्या सुरेगाव शिवारातील शेतातील विहिरीच्या पाण्यात टाकून दिले अशी फिर्याद अनिलची आई विमल घुसळे यांनी दिली. 

यावरून पोलिसांनी दोघांविरूद्ध गु.र.नं. १११/२०१८, भादंवि कलम ३०२, २०१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला. तसेच दोघांना शिताफीने अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.