पत्त्याच्या क्लबवर छापा ; २१ जण ताब्यात,अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर ते पुणे रोडवरील रेल्वे ब्रीजचे खाली प्रियंका कॉलनी शेजारी पत्र्याच्या शेडमध्ये जावेद इब्राहिम शेख व फिरोजखान सुलेमान खान यांच्या पत्त्याच्या क्लबवर पोलिसांनी छापा अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी २१ जणांना ताब्यात घेतले आहे.

Loading...
याप्रकरणी मधुकर नाथजी मोहिते (वय ३७, रा. कल्याण रोड, अ.नगर), वैभव विलास पाचारणे (वय २२, रा. वैष्णवनगर,केडगाव), मोसिन अफजल पठाण (वय ३३, रा. एकनाथ नगर, केडगाव), जलील ताजुद्दीन पठाण (वय ५६,रा.आशाटॉकीज मागे, नगर), अनिल बाबासाहेब भागवत (वय ६०, रा. कुंभारगल्ली, नालेगाव), शेख रज्जाक अब्दुल सौदागर (वय ४०, रा. तख्तीदरवाजा, नगर), अजिंक्य रमेश म्हस्के (वय ३१, रा. रामचंद्र खुंट, नगर), सुधाकर सर्जेराव डांगळे (वय ५०, रा. झेंडीगेट, नगर), संजु अंबादास कुलकर्णी (वय ३५, रा. सावेडीगाव), संदीप बबन सावंत (वय ३०, रा. आगरकरमळा), विजय चांदमल मुनोत (वय ५६, रा. विनायकनगर), जयेश चंद्रशेखर मिस्त्री (वय ३२, रा. मल्हार चौक,नगर), विकास विलास करपे (वय ३२, रा. पंचपीर चौक, माळीवाडा), सचिन संजय राऊत (वय २७, रा. बुरुडगाव रोड, राऊतमळा), फिरोजखान सुलेमान खान (वय ५५, रा. आशा टॉकीज चौक, अ.नगर), शेख मोहसीन इंसा मोद्दीन (वय ३०), भाऊसाहेब दत्तात्रय सेंदर (वय ३६, रा. सर्जेपुरा, अ.नगर), शाकीर सिकंदर शेख (वय ३६, रा. आशा टॉकीज चौक, नगर), पंडीत सुखदेव खुडे (वय ३५, रा. स्टेशन रोड, कायनेटीक चौक), सुरेश शिवदास नन्नवरे (वय ३२, रा. कायनेटीक चौक, नगर), जावेद इब्राहिम शेख (रा. गांधी मैदान, नगर) यांना ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलिस अधिक्षक घनश्याम पाटील यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके, पोसई शिवाजी नागवे, पोना हेमंत खंडागळे, पोना महेश मगर, पोना सचिन जाधव, पोकॉ.अभिजित अरकल, पो.कॉ सुजित सरोदे, पोकॉ सानप, पोकॉ. माशाळकर, पोकॉ घोलप, पोकॉ पवार, पोकॉ शेख, पोकॉ दळवी यांनी केली आहे. याप्रकरणी २१ आरोपींविरुध्द पोकॉ अभिजीत अरकल यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.